
अमळनेर:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 133 शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर करण्यात आली आहे, सदर प्रशिक्षणार्थीना मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी नियुक्ती पत्र देण्यात आले
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि शिक्षण विभाग, केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र पंचायत समितीच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात देण्यात आले, यात 130 प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तर 3 प्रशिक्षणार्थींना उर्दू माध्यमाच्या शाळेंवर नियुक्ती देण्यात आली सदर कार्य प्रशिक्षण कालावधी, रुजु झाल्यापासुन ६ महिने असून,त्यांनतर सदर प्रशिक्षण संपुष्टात येणार आहे,




