
अमळनेर:- मुंबई येथे आझाद मैदानावर 23 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधन वाढ जीआर ताबडतोब काढा यासाठी उपोषण सुरू झालेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमळनेर प्रांत कार्यालयावर व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास प्रकल्प अधिकारी यांना 25 रोजी अंगणवाडी सेविकांचा आक्रोश मोर्चा बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव भानुदास पाटील उपस्थित होते. अमळनेरला मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन भानुदास पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.




