
अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील फिडर मध्ये तातडीचे काम करायचे असल्याने २८ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जानवे ,वावडे आणि भरवस उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरण चे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी कळविले आहे.
जानव्याच्या ३३ केव्ही फिडर चे देखभाल दुरुस्तीचे काम तसेच विद्युत तारांना नडणारे झाडे तोडण्यात येणार असल्याने जानवे ,वावडे , भरवस या तिन्ही केंद्रतील सुमारे २० हजार ६०० ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान बंद राहील. नागरिकांनी आपली कामे सकाळी दहा वाजेपुर्वी करून घ्यावीत असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.




