
अमळनेर:- महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे तीर्थ क्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर भागात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे. श्री गुरुदेव दत्त मंदिर श्री चमत्कारी शनी मंदिर महादेव मंदिराचा परिसर यांचा मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कै.सु आ पाटील माध्य विद्या.पिंपळे मुख्याध्यापक संजय भोसले व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.




