असंख्य नवंमतदारांची झाली नोंदणी
अमळनेर – न्यू प्लॉट परिसर विकास मंच आयोजित नवरात्रोत्सव मंडळातर्फे आणि अमळनेर निवडणूक विभाग व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित मतदार नाव नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर, सहा निवडणूक निर्णय अधिकारी रुपेशकुमार सुराणा,मुख्याधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.सदर अभियान संपूर्ण शहरासाठी असल्याने न्यू प्लॉट सह इतर प्रभागातील नवं मतदारांनी देखील येथे नोंदणी केली. यात नव मतदारांची नोंदणी,मतदार यादीत दुरुस्ती,प्रभाग बदल यासह इतर सुविधा देखील देण्यात आल्या.यासाठी निवडणूक विभागाचे बी एल ओ अविनाश संदानशिव,प्रसाद शर्मा,साबीर अब्दुल मूनाफ मोफिन यांची नेमणूक निवडणूक विभागाने केली होती त्याना निवडणूक विभागाचे प्रशांत धमके,नितीन ढोकने आणि अक्षय सातपुते यांचे सहकार्य लाभले.तर अभियान यशस्वीतेसाठी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत, उपाध्यक्ष महेंद्र पाटील,डॉ संदीप सराफ,बिपीन पाटील,महेश राजपूत,प्रशांत लंगरे,जयदीप राजपुत व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान सदर मंडळाकडून उद्यानातील नवरात्र उत्सवाच्या प्रांगणात निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या माहितीचे फलक लावून मतदान जनजागृती देखील केली जात आहे.या उपक्रमाचे निवडणूक विभागाने कौतुक केले.तर नागरिकांना देखील मतदार नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करून दिल्याने नागरिकांनी निवडणूक विभाग व न्यू प्लॉट परीसर विकास मंचचे आभार व्यक्त केले.