
अमळनेर:- तालुक्यातील मुडी बोदर्डे येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १२ रोजी घडली आहे.
बोदर्डे येथील २५ वर्षीय तरुण सागर विकास भील हा पत्नीसोबत राहत मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. १२ रोजी त्याने राहत्या घरात स्लॅबच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत ईशी हे करीत आहेत.




