अमळनेर:- विधानसभा मतदार संघासाठी अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत तीन राष्ट्रीय पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. उर्वरित उमेदवार अपक्ष आहेत. ३० रोजी सकाळी ११ वाजेला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.
नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे अनिल भाईदास पाटील (हिंगोणे खुर्द) तसेच जयश्री अनिल पाटील (हिंगोणे खुर्द) या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र जयश्री पाटील यांनी ए व बी फॉर्म सादर केलेला नाही. इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे डॉ अनिल नथ्थु शिंदे (अमळनेर) यांनी, सचिन अशोक बाविस्कर (मल्हारपुरा चोपडा) यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे, तर अपक्ष म्हणून शिरीष हिरालाल चौधरी (स्टेशन रोड अमळनेर), अनिल भाईदास पाटील (रणाईचे), शिवाजी दौलत पाटील (लोण), प्रा अशोक पवार, कैलास दयाराम पाटील, प्रतिभा रवींद्र पाटील, निंबा धुडकू पाटील (वाघोदे), अमोल रमेश पाटील (अमळगाव), प्रथमेश शिरीष चौधरी (अमळनेर), संगीता प्रमोद पाटील (कळमसरे), रतन भानु भिल (भोलाणे ता पारोळा ), छबिलाल लालचंद भिल (कोळपिंप्री ता पारोळा) यांनी तर प्रदीप किरण पाटील (सोनखेडी) यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष तर्फे अर्ज दाखल केला आहे.