
रसिक प्रेक्षकांना झाला आनंद, शेजारील तालुक्यातून आले प्रेक्षक…
अमळनेर:- दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सहा वर्षानंतर चित्रपट गृह सुरू करण्यात आले. मिडटाऊन येथे कलावती गोकलाणी यांच्या हस्ते एस एस सिनेप्लेक्स चा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उद्योगपती सरजु गोकलाणी, सिनेप्लेक्सचे मालक संजय सुराणा उपस्थित होते.
अमळनेरातील अखेरचे चित्रपटगृह तंबोली टॉकीजची जागा उद्योगासाठी घेतल्यानंतर सरजु गोकलाणी यांनी प्रेक्षाकांच्या, रसिकांच्या आवडीला दाद देत याच ठिकाणी आधुनिक चित्रपट गृह उभारून रसिकांची स्वप्ने पूर्ण केले जातील असा निश्चय केला होता. सरजु गोकलाणी यांच्या सहकार्याने भुसावळ चे संजय सुराणा यांनी एस एस सिनेप्लेक्स उभारले. वातानुकूलित आरामदायी बैठक व्यवस्था, मोठा पडदा, चित्राची गुणवत्ता आणि स्पष्ट आवाज असे वैशिष्ट्य असलेले दोन प्लेक्स प्रत्येकी १४८ ची बैठक व्यवस्था असलेली उभारण्यात आली आहेत.
पहिल्याच दिवशी १ रोजी सिंगम अगेन, भुलभुलैया ३ हे दोन चित्रपट दाखवण्यात आले. यावेळी पारोळा, धरणगाव, बेटावद, चोपडा व परिसरातून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आले होते. पुन्हा अमळनेरात चित्रपटगृह सुरू झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.




