निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार
अमळनेर-विधानसभा मतदारसंघात आज सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीसाठी अखेरची मुदत असून यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणातून अजून एकानेही अर्ज माघारी घेतला नसून यामुळे काहींना मनविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.बंडखोरी थांबविण्यासाठी विशेष मनधरणी झाली आहे.आज माघारी नंतर चिन्हांचे ही वाटप केले जाणार असून त्यानंतर निवडणूकित खरी रंगत वाढणार आहे.