डॉ. अनिल शिंदे ह्या आरोग्यसेवेच्या नायकामागे महाविकास आघाडी भक्कमपणे उभी
अमळनेर:- महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार अमळनेर तालुक्यात जोरात सुरू असून त्यांना स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमळनेर तालुक्यातील विकासाबद्दल बोलायचे झाल्यास, कागदावरचे आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात एक मोठा विरोधाभास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे विकास झाला का? हा एक प्रश्न आहे. कमिशन आणि टक्केवारीच्या राजकारणामुळे अमळनेरचे विकास थांबल्याचे चित्र दिसते, असे अनंत निकम यांनी सांगितले. नर्मदा फाउंडेशनमधील डॉ. अनिल शिंदे यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी अनेकांना आरोग्य सेवेत मदत केली आहे. यामुळे स्थानिक जनतेत त्यांच्या कार्याची कदर केली जाते.
डॉ. शिंदे काँग्रेस पक्षाचे एक अनुभवी पदाधिकारी असून, त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप न लागल्याने त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत आहे.
अमळनेरच्या समस्यांची जाणीव
अमळनेर तालुक्यात रोजगाराची कमी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसणे, जसे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, हे गंभीर मुद्दे आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना योग्य काम मिळत नाही आणि अनेक कंपन्या अमळनेरमध्ये अद्याप स्थापन झालेल्या नाहीत. हे लक्षात घेता, अमळनेरचा वास्तविक विकास साधायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. डॉ. अनिल शिंदे यांनी जातीपातीच्या राजकारण कधी केले नाही .अमळनेर तालुका त्यांच्या पाठीशी त्यांची मतदारसंख्या भक्कमपणे उभी राहील, अशी आशा अनंत निकम यांनी व्यक्त केली आहे. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमळनेरचा खरा विकास साधणे शक्य आहे. स्थानिक जनतेने त्यांना पूर्ण समर्थन देऊन या ऐतिहासिक संधीचा लाभ घेतला पाहिजे. महाविकास आघाडीच्या यशाने अमळनेरचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला आहे. Ll महाविकास आघाडीचे उच्च शिक्षित डॉ अनिल शिंदे यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे आवाहन अनंत निकम यांनी केले आहे. मा. शरदचंद्र पवार यांनी जो शब्द दिलाय “पुढील निवडणुकीत अनिल पाटील निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ ” हे खरे ठरवतील, असा आशावाद अनंत निकम यांनी व्यक्त केला.