माजी आमदार शिरीष चौधरी यांना सुज्ञ नागरिक विचारू लागले सवाल…
अमळनेर:- माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बाहेरून आणलेली गर्दी जमवत मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला. मात्र शिरीष चौधरी गेली साडेचार वर्ष कुठे होते ? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.
२०१९ च्या विधानसभेत नामुष्कीजनक पराभव झाल्यानंतर लगेच चौधरी कुटुंबीय गाडीने नंदुरबार रवाना झाले. गेल्या पाच वर्षात अनेकदा तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या व कोरड्या दुष्काळाने झोडपले, मात्र माजी आमदार कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर दिसले नाहीत. गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील कोणत्याही प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला नाही, मात्र निवडणूकीची आचारसंहिता लागेल त्याच्या पंधरा दिवसआधी चौधरी कुटुंबीयांनी आपला मुक्काम अमळनेरात हलविला. तालुक्यात कोणताही विकास झाला नाही असा आरोप करणारे माजी आमदारांना गेली पाच वर्ष अमळनेर आठवले नाही का ? असा खडा सवाल अमळनेरकर जनता विचारत आहे.
पुढील भागात,
कार्यसम्राट म्हणवून घेणाऱ्या माजी आमदारांच्या पाच वर्षातील विकासकामांची पोलखोल…