अमळनेर:- तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे.
याबाबत यमुना उज्जैन पाटील (वय २२) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना घराशेजारी राहणारा राकेश दगडू पाटील हा आला, आणि भिंतीचे काम करू नका असे सांगितले.तसेच त्याने वडील दगडू चैत्राम पाटील यांना बोलावून आणले. त्यांना फिर्यादी व तिचे वडील यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार काम करीत आहोत असे सांगितले, मात्र दगडू पाटील यांनी फिर्यादीची बहिण भावना हिच्या हातातील मोबाईल फेकला. त्यानंतर दगडू याची मुलगी सुरेखा उर्फ पूनम हिने भावना हिच्या छातीवर बसून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी व तिचे आई वडील गेले असता त्यांनाही ढकलून देत मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या डोक्याला, हाताला व तिच्या वडिलांच्या नाकाला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर ११ रोजी उपचार घेवून घरी परत येत असताना पुन्हा दगडू पाटील याने घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याने फिर्यादीने अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास हेकॉ गणेश पाटील करीत आहेत.