
अमळनेर:- शहरातील पिंपळे रस्त्यावर कृषी विकास कॉलनीजवळ रस्ता उंच झाला असून जोड रस्ता खाली झाल्याने वाहनचालकांचे अपघात प्रमाण वाढले आहे.

याबाबत पालिकेचे दुर्लक्ष असून वाहनचालकांच्या अपघातास जबाबदार कोण असा सवाल व्यक्त होत आहे. हा धुळे रोड तर गलवाडे रोड असा जुना शॉर्टकट रस्ता आहे. याठिकाणी कृषी विकास कॉलनी जवळ उतार आहे त्यामुळे अचानक वाहने धडकतात. यावर रहदारीचे प्रमाण मोठे आहे. गलवाडे रस्त्याकडून येऊन इकडे धुळे रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांना सोईचे असते. त्यामुळेच कृषी कॉलनी तर विठ्ठल नगर मधून जाणाऱ्या वाहनचालकांना खूप त्रास होत आहे.
रात्री अचानक वाहन जाताना ठोकणे, तर येतांना खाली कोसळणे याचे प्रमाण वाढले आहे. जवळ गटारीची तुटलेली जाळी आहे. त्यामुळे त्याच्यामुळे अधिक धोका वाढला आहे. मात्र ठेकेदाराने काम करतांना मानवता म्हणून त्याठिकाणी स्लोप टाकलेला नाही. याबाबत अनेक नागरिकांनी विनंती करून देखील ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र याबाबत नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे.
जाळी तुटलेल्या अवस्थेत मात्र पालिकेचे दुर्लक्ष एकदा खोल गटारीत जाऊन पडेल इतके भगदाड त्याठिकाणी पडले आहे. नागरिकांनी विनवणी करून देखील याकडे पालिकेने त्वरित हा फरशी दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
रस्त्याच्या ठेकेदाराला विनवणी केली. मात्र त्याने स्लोपच टाकला नाही. याकडे नागरिकांनी वारंवार सांगून पालिकेने येथील जाळी दुरुस्ती केली नाही याठिकाणी नवीन फरशी पूल करावा अशी अपेक्षा आहे. – नाना पाटील, नागरिक- कृषी विकास कॉलनी.




