
अमळनेर : गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीतील किसन दिलीप भिल वय १७ याने स्वतःच्या बेडरूम मध्ये छताच्या लाकडी दांड्याला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना १ रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेदरम्यान घडली.

किशन हा रात्री बाहेरून आला व बेडरूम चा दरवाजा लावून घेतला. त्याचे वडील दिलीप साहेबराव भिल जेवणासाठी आवाज द्यायला गेले. त्याने उत्तर दिले नाही म्हणून दरवाजा तोडून पाहिले असता त्याने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी किसन यास मयत घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.




