
अमळनेर :- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे २४ रोजी निंबा दला चौधरी यांच्या शेतात येथे खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तूर या वानाविषयीं सखोल माहिती जिल्हा व्यवस्थापक जोशी यांच्या मार्फत देण्यात आली.

कृषी क्षेत्र अधिकारी मोहिनी जाधव यांच्या मार्फत ज्युट , जैविक खते, बुरशीनाशके व भाजीपाला बियाणे यांच्या जास्तीत जास्त वापराविषयीं आवाहन करण्यात आले. यावेळेस प्रगतीशील शेतकरी निंबा चौधरी ह्यांनी सोलर सिस्टिम वर चालणाऱ्या कामगंध सापळा विषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमांस परिसरातील शेतकरी, माजी शेती संघ प्रेसिडेंट संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, जीवन पाटील, जयवंत पाटील, गोकुळ पाटील, निंबा चौधरी, छोटू चौधरी, भीमराव पाटील,राजेंद्र पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते




