
अमळनेर:- येथील कम्युनिस्ट शाखेतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९९ वा वर्धापन दिवस अमळनेरात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांनी प्रास्ताविक केले , कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेंच कार्यक्रमाचे आयोजक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जळगाव जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चे योगदान देशासाठी कित्येक कम्युनिस्ट अमर हुतात्मा झाले शहित भगतसिंह, आणि साथीदार, इंग्रजांच्या काळात महान क्रांतीकारक क्रातीसिह नाना पाटील, त्यांच्या तुफान सेनेत मोलाची भुमिका निभावणारे डांगरीचे डॉक्टर उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील यांनी अमळनेर कोर्ट जाळले इंग्रज राजवटीला हैराण करून सोडले असे महान क्रांतीकारक आपल्या अमळनेर येथे होवुन गेलेत, एका मिल मजदुरास न्याय मिळवून देण्यासाठी कॉम्रेड श्रीपत पाटील आणि त्यांचे आठ साथी असे कामगार नेते जिवाची बाजी लावून जालीम सरकारच्या जुलमाचे शिकार झाले.
पक्षाचे ध्येय, धोरण हे सर्व सामान्य नागरिकांना योग्य न्याय मिळवून देणे हाच असून जनतेने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होवुन आपल्या हक्काच्या लढाईसाठी पक्षात सामिल व्हावे असे आव्हान जिल्हा सेक्रेटरी यांनी केले. पक्षाचे झेंडागीत होवुन कार्येमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमात बहुसंख्य पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.




