
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील हेडावे येथील महिलेला शेतीच्या शुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेडावे येथील देविदास आसाराम पाटील व सुभाष लुकडू पाटील यांचे शेती एकमेकांच्या शेतलगत लागून शेत आहेत.२४ रोजी देविदास पाटील हे शेतात काम करत असताना त्यांचे सुभाष पाटील यांच्याशी काही कारणावरून वाद झालेत.वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने देविदास पाटील यांच्या मुलाने आईला शेतात बोलवून घेतले.पतीला होणारी मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला सुभाष पाटील यांनी बरगडी मधे लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी गंभीर मारहाण झाल्याने महिलेला चक्कर आले.शेजारील काही लोकांच्या मदतीने भांडण सोडविण्यात येऊन महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र पुढील उपचारासाठी महिलेला धुळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
महिलेच्या फिर्यादीवरून सुभाष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे कॉ
लक्ष्मीकांत शिंपी हे करत आहेत.




