
अमळनेर – तालुक्यातील शिरुड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत ग्रामस्थ व बोरसे परिवार मित्र मंडळामार्फत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

शिरुड येथील रहिवासी असलेल्या स्व.सौ.मनिषा प्रविण बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यांनी स्वतःच्या पगारातून खर्च करून नेहमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा व कार्यक्रम घेऊन त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले. त्यांच्या स्मरणार्थ असलेल्या या स्पर्धेंत दोघी शाळांमधील एकूण 220 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व प्रत्येक वर्गातून तीन याप्रमाणे 34 विद्यार्थ्यांनी अभ्यास उपयुक्त बक्षिसे मिळवली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कृतिशील उपक्रमातून नेहमी प्रोत्साहन देत असल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांना देखील ग्रामस्थांतर्फे शैक्षणिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.दत्त दूध उत्पादक सह.सोसायटीचे सेवानिवृत्त सचिव संतोष बोरसे हे होते. मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. श्रीमती सविता बोरसे यांनी आभार मानले. स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा पुष्पलता सोनवणे, अतुल सोनवणे, रजनीकांत पाटील, शशिकांत पाटील, विनायक पाटील, पुंजू पाटील, हेमंत सोनवणे, रविंद्र पाटील,अमोल पाटील, विजय बोरसे, गणेश बोरसे, भूषण बोरसे, ज्ञानेश्वर महाजन, डि.ए.धनगर यांनी सहकार्य केले.




