
अमळनेर तालुक्यातून दोनच विद्यार्थी उत्तीर्ण
अमळनेर – शहरातील न्यू प्लॉट भागातील रहिवासी असलेले देव प्रविण पारेख व रोनक संदेश कोठारी सी. ए. फायनल उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटट होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे.

देव पारेख हा कृष्णा प्रोव्हिजन चे मालक प्रविण पारेख यांचा सुपुत्र तर गोकुळ पारेख यांचा पुतण्या असुन त्याने नाशिक येथून 11 वी आणि 12 वी च्या शिक्षणा नंतर बी कॉम करून सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नात सी ए फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे.
तर रोनक कोठारी हा मनोकामना साडी सेंटर चे मालक संदेश कोठारी यांचा सुपुत्र तर भरत कोठारी यांचा पुतण्या आहे.त्याने दहावी नंतर गुणवत्तेच्या बळावर पुणे येथील सिंबोयसिस कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून महाविद्यालयीन व पदवी चे शिक्षण पूर्ण केले व सोबतच सी ए फायनल परीक्षा देखील तो उत्तीर्ण झाला आहे.यानंतर सी एफ ए चा अभ्यास करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान भारतातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सी ए परीक्षेचा निकाल दिनांक 26 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून यात केवळ 13 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे अमळनेर तालुक्यातून दोनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात देव पारेख व रोनक कोठारी यांचा समावेश आहे.दोन्ही गुणी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप व न्यू प्लॉट परिसर विकास मंच तर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.




