
अमळनेर – तालुक्यातील देवळी येथील सरस्वती महाविद्यालय देवगाव च्या बीएससी व बी. सी. ए.च्या गरीब व होतकरू विदयार्थी विदयार्थिनींना भारतातील नामांकित कंपनी इंडिया बुल या कंपनी द्वारे शिष्यवृत्ती देण्यात आली.

या शिष्यवृत्ती मुळे सदर विद्यार्थ्यांचा फी व खर्चाचा प्रश्न सुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. विवेक तुळशीराम महाले, अर्जुन पांडुरंग भील, कमलेश अनिल पाटील, जयेश चंद्रभान पाटील, करण गोविंदा वडर, मनोहर संजय पारधी, गोपीचंद रामचंद्र पवार, वासुदेव प्रकाश धनगर, अश्रफ अन्वर सुतार (बी.सी.ए .), वैष्णवी श्रीराम पाटील, नंदिनी दत्तू पाटील या सर्व विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. डी. एस. भावसार तसेच प्राचार्य जे. बी. जैन, एम. एस. चौधरी, विजया पाटील, जे. जी. बडगुजर, ए.एस. कोळी, जी. एस. धनगर, डी. ए. चौधरी, एन. एस. देवरे , एस.आर. शेख, प्रा. कुवर यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष पी. एच. पाटील यांनी केले.




