
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव रस्त्यावर जळोद फाट्याजवळ एसटी बसने दुचाकीस्वार वृद्ध इसमाला धडक दिल्याने जबर जखमी झाल्याची घटना २८ रोजी घडली आहे.

प्रवीण शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील शालिग्राम मंसाराम पाटील (वय ६५) हे २८ रोजी दुपारी २ च्या सुमारास स्वतःच्या दुचाकीने अमळगावकडे जात असताना जळोद फाट्याजवळ वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल ०९३४) वरील चालकाने भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे शालिग्राम पाटील यांच्या चेहऱ्याला, तोंडाला, हातापायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




