
अमळनेर:- जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नवीन कार्यकारणी निवडीबाबत चर्चा झाली. त्यात सुनील पाटील यांनी एकूणच वर्षभरातील विविध समाजपोयगी असे १५ उपक्रम राबवले आणि समाजातील सर्वच घटकांना त्यांच्या या खालील उपक्रमांनी फायदा झालाने ज्यात की पालिकेतील दिवाबत्ती विभागात दिवाळी फराळ वाटप, दिव्यांग दिनानिमित्त संस्थेला निधीवाटप, नववर्षाच्या संध्येला वृक्षारोपण, बळीराजा दिन निमित्ताने त्याच्या निर्माण केलेल्या अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ३२ मंगल कार्यालयात अन्न बचत फलक लावण्यात आले.

पिंपळी येथे पीडित कुटुंबाचा सर्व संसार उध्वस्त झाला होता. त्यांना २ महिने पुरेल इतका किराणा , कपडे ,व संसारउपयोगी वस्तू देण्यात आल्या. परिश्रम मतिमंद विद्यालयात शालेय क्रीडा साहित्य वाटप, इंधवा कावपिंप्री येथे २०० विद्यार्थी यांचे मोफत रक्तगट शिबिर
8) एमएस सीआयटी आणि बांधकाम सुपरवायझर या कोर्स साठी विद्यार्थ्यांना फी मध्ये जायन्ट्तर्फे २० टक्के सवलत जायन्ट्स राजेंद्र भावसार यांचेकडून देण्यात आली, जिराळी येथे १५० विद्यार्थी यांचे मोफत रक्तगट शिबिर,
अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्य दिंडीत एक हजार विद्यार्थ्यांना पर्क चॉकलेट वाटप, अंध अपंग व्यक्तींना मोफत किराणा वाटप, वाडी चौक येथे रक्तदान शिबिर, नगाव येथिल निवासी आश्रम शाळेत २५० विद्यार्थ्यांचे मोफत दंत चिकित्सा शिबिर आणि सवलती त उपचार, तुळसी विवाह निमित्ताने मंगळ ग्रहतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सुमारे ८०० विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप
मतदान जनजागृती निमित्ताने ४ हजार पत्रक तयार करून मतदानाच्या आदल्या दिवशी वर्तमानपत्र मध्ये वितरित केल्या गेल्या. असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.
त्याचप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नवीन लोकांना संधी देण्यात यावी या उद्देशाने राजेंद्र भावसार व डॉ महेश पाटील यांची उपाध्यक्षपदी, तर सचिव संदिप महाजन, खजिनदार राजेंद्र पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
या याप्रसंगी संघटनेचे माजी उपाध्यक्ष रमेश महाजन, माजी सचिव प्रशांत पाटील माजी खजिनदार ऍड राजेंद्र चौधरी, प्रा राजेंद्र भावसार, चंदूलाल बडगुजर, महेश पाटील, सुनिल पाटील,संजय मुंडके आदी उपस्थित होते.
येत्या पुढील दिवसात लवकरच नवनियुक्त फेडरेशन २ ए चे अध्यक्ष श्री किरण शेवाळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमळनेर येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी पद्ग्रहण होईल अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.




