
अमळनेर : नोकरीचा फॉर्म भरून येते म्हणून सांगून गेलेली तालुक्यातील निंभोरा येथील २५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ३ रोजी घडली.

निंभोरा येथील एक २५ वर्षीय तरुणी नोकरीसाठी फॉर्म भरून येते म्हणून सकाळी निघाली. सायंकाळच्या बस ने देखील परत आली नाही म्हणून तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.




