
पत्रकार संघाच्या संगणक कक्षाचे व प्रोजेक्टर युनिट चे उद्घाटन
अमळनेर:- सालाबादप्रमाणे काल 6 जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील योगा भुवनात आद्य पत्रकार दर्पण कार बाळशास्त्री जांभकरांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिजाऊ बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा ऍड ललिता श्याम पाटील यांनी पत्रकार संघात संगणक व प्रिंटर युनिट दिल्याने तसेच उध्दव सेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांनी प्रोजेक्टर सेट दिल्याने या दोन्ही युनिट चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जात असतो.योगा भवनात आयोजित सोहळ्यात सुरवातीला चेतन राजपूत यांनी प्रास्तविक करून आज पत्रकारांसाठी एक वास्तू व सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.माजी आमदार डॉ बी एस पाटील,आय ए एस अधिकारी तथा मुख्याधिकारी वेवो तोलु केजो,ऍड ललिता पाटील,पोलीस निरीक्षक विकास देवरे,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे, संदीप घोरपडे,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे,न प कामगार संघटनेचे अध्यक्ष सोमचंद संदांनशिव आदींनी मनोगत व्यक्त करून पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडेगावकर यांनी पत्रकार सन्मान योजनेसाठी लढा दिला तसेच त्यांना स्वतःला पेन्शन सुरू झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकारांच्या वास्तू साठी मेहनत घेणारे जितेंद्र ठाकुर व संजय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शरद शिंदे व वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील यांनी पत्रकार बांधवांना ट्रॅव्हल बॅग भेट दिल्या. पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे,गोविंद अग्रवाल,निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी,भाऊसाहेब देशमुख,महावीर पतपेढी चे चेअरमन प्रकाशचंद्र पारख,विहिप चे अध्यक्ष डॉ संजय शाह,जयदीप राजपूत,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी.के. सुर्यवंशी,शहराध्यक्ष मनोज पाटील,सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या दर्शना पवार, निमाचे अध्यक्ष डॉ विशाल बडगुजर,डॉ दिनेश महाजन, माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील,संजय कौतिक पाटील,माजी नगरसेवक प्रविण पाठक,योगराज संदांनशिव, पंकज चौधरी, महेश पाटील,गुणवंतराव पाटील,बी आर बोरसे, न प चे बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,मनोज पाटील, पक्षीमित्र सुनिल भोई,गोल्डी बिऱ्हाडे,यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, सचिव जितेंद्र ठाकूर, तसेच किरण पाटील,महेंद्र रामोसे,चंद्रकांत पाटील,चंद्रकांत काटे, डॉ.विलास पाटील, अमोल पाटील, बाबूलाल पाटील, पांडुरंग पाटील, संदीप पाटील,युवराज पाटील, संभाजी देवरे,श्यामकांत पाटील,विजय पाटील,योगेश महाजन, मुन्ना शेख,आबिद शेख,हिरालाल पाटील, गजानन पाटील, वसंतराव पाटील, महेंद्र पाटील,अनिल पाटील, काशिनाथ चौधरी,किशोर पाटील,विकी जाधव यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अमळनेर तालुका पत्रकार संघटनेकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोंभूर्ले केंद्रशाळा, साखरवाडी, देऊळवाडी, बागबौद्धवाडी व मालपे धनगरवाडी या पाच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. या शाळांचे मुख्याध्यापक, समिती अध्यक्ष, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी संघटनेचे आभार मानले आहेत. तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व सध्या पोंभूर्ले येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गणेश विलास पाटील यांच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आले.




