
अमळनेर – येथील वामन नगर मधील रहिवाशी वेदांत रविंद्र पाटील याने बी टेक आय टी करून भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट (क्लास -1) पदावर नियुक्ती झाली असुन तो सध्यस्थीत केरळ येथील कन्नूर (झिमला) येथे प्रशिक्षण घेत आहे.

वेदांत हा रविंद्र आधार पाटील ह.मु.इंदौर (मध्यप्रदेश) व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एस.सी. सोनवणे यांचा नातु असुन त्याने बी टेक आय टी इंदौर येथे शिक्षण घेतले व रिटन एक्झाम,एस एस बी इंटरविव्ह , मेडिकल टेस्ट,मिरीट कॉन्फरन्स टेस्ट आदी चाचण्या यशस्वी रित्या पूर्ण केल्या त्याच्या ह्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे





