
अमळनेर:- पुणे येथील प्रज्ञा बहुउद्देशीय साहित्य संस्था यांनी 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या कथा कादंबरी आत्मचरित्र वैचारिक साहित्य इत्यादी ग्रंथासंदर्भात पुरस्कार जाहीर केले होते .परीक्षकांनी आलेल्या ग्रंथातून गुणात्मक मूल्यमापन केले प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर लिखित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार या ग्रंथास वैचारिक साहित्य गटात प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा लीना देगलूरकर यांनी त्यांना कळविले आहे.

मागील वर्षी अमळनेर येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे सर यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते . स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावर आधारित या ग्रंथाला अभ्यासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . एप्रिलमध्ये पुणे येथे होणाऱ्या प्रज्ञा साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण होईल. ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे प्रा.डॉ. प्रभाकर जोशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे




