
अमळनेर -नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक सोमचंद छगन संदानशिव हे आपल्या नियत वयोमानानुसार दिनांक 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याने सेवानिवृत्ती निमित्त इंदिरा भुवन येथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

सुरवातीला सोमचंद संदानशिव यांची सपत्नीक पालिका कार्यालयातून इंदिरा भुवन पर्यंत कामगार वर्गाकडून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.यानंतर इंदिरा भुवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील होते.संदानशिव यांची 30 वर्ष 4 महिने सेवा झाली असून त्यांनी नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्ष,सानेगुरुजी न प कर्मचारी पतपेढी चेअरमन आदी पदांवर काम केले असून नुकतीच त्यांची नगरपरिषद अधिकारी कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.यामुळे कामगार नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर,जळगाव जनता बँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, महावीर पतपेढी चे चेअरमन प्रकाशचंद्र पारेख,माजी नगरसेवक मनोज पाटील,नरेंद्र संदानशिव,प्रा अशोक पवार,प्रविण पाठक, सुनिल भामरे,विक्रांत पाटील,प्रा डॉ विजय तुंटे, जावई मिलिंद करनकाळे, राहुल बिऱ्हाडे, राजेंद्र निकुंभ सर पत्रकार किरण पाटील, विनोद कदम सर, प्रा. डॉ. राहुल निकम, बौद्धचार्य द. रु. सैंदाणे, ज्ञानेश्वर संदानशिव, श्रीचंद चव्हाण, इम्रान खाटीक, प्रेम शाह ऍड. लाठी, प्रसाद शर्मा, अरुण पाटील, सुनील भोई,पिंकू पटेल,जयेश जोशी, चंद्रकांत शिंगाने, आर. डी. लांबोळे,मदन पाटील यासह मान्यवर उपस्थित होते,सुरवातीला चेतन राजपूत यांनी परिचय करून दिला.आमदार अनिल पाटील तसेच मुख्याधिकारी श्री नेरकर,प्रा.अशोक पवार,प्रविण पाठक,प्रा तुंटे यांनी मनोगत व्यक्त करत संदानशिव यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांच्या मुलींनी देखील भावना व्यक्त केल्या.शेवटी संदानशिव यांनी सत्काराला उत्तर देत सर्वांचे ऋण व्यक्त केले.
सुत्रसंचालन संजय चौधरी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप,माझं गाव माझं अमळनेर ग्रुप,न प कर्मचारी संघटना आदींनी परिश्रम घेतले.शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातून मान्यवर उपस्थित होते.




