
अमळनेर:- बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन मोटरसायकलस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.

बापू शिंगाणे रा भोईवाडा हे नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची पत्नी सुरेखा हिच्यासह आयडीबीआय बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी मोटरसायकल ला टांगली आणि पिशवी मांडीत ठेवून घराकडे आले. घराजवळ मोटरसायकल थांबवली असता काळ्या मोटरसायकलवर दोन इसम आले आणि त्यांनी पैश्यांची पिशवी हिसकावून कसाली डीपी कडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनेचे वृत्त कळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी भाऊसाहेब घोलप,पोलीस निरीक्षक विकास देवरे, पीएसआय नामदेव बोरकर, मंगल भोई, विनोद संदशीव ,अमोल पाटील, नितीन कापडणे,रवींद्र पाटील, पूनम हटकर यांनी भेट दिली. बापू शिंगाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.




