
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांचे भाविकांना उपस्थितीचे आवाहन
अमळनेर – महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज ”मठाधिपती” कपिलेश्वर महादेव मंदिर निंब ता अमळनेर यांचे परमशिष्य परमादर्श स्वामी श्री.देवेश्वरतीर्थ यांना कुंभ मेळा प्रयागराज येथे अखिल भारतीय संत समितीने महामंडलेश्वर पदवी देवून सन्मानीत करण्यात आले. त्यांचा ता. १९ रोजी श्री. क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.देवेश्वरतीर्थ महाराज यांनी अध्यात्मिक क्षेत्रात कमी वयात एव्हढी उंची गाठणे हे केवळ सामर्थ्य प्राप्त गुरु कृपाआशीर्वादाशिवाय शक्य नाही. या सर्वगुण संपन्न महामंडलेश्वर स्वामी श्री.देवेश्वरतीर्थ महाराजांच्या भव्य दिव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन ता. १९ रोजी सकाळी ९. ३० वाजता श्री. क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप असून याप्रसंगी जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, महामंडलेश्वर हंसानंदजी महाराज, भक्त निंब -मुडावद यांनी केले आहे.




