
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी नेत्रदान जनजागृती अभियानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियानाचा संदेश समाजातील अनेक लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. व्हि.डि. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा. डॉ.पवन पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अनेक स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.




