
प्रसाद शर्मा यांची संस्थेकडे मागणी
अमळनेर:- खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर,कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने त्रेवार्षिक सन २०२५ ते २०२८ चा निवडणूक कार्यक्रम त्वरित लावावा या मागणीचे निवेदन संस्थेचे सभासद प्रसाद शर्मा यांनी संस्थेचे अध्यक्ष व चिटणीस यांना दिले आहे.
यात म्हटले आहे की F-22 च्या चेंज रिपोर्ट नुसार वर्ष २०२२ ते २०२५ हा नामंजूर झाला असुन माजी अध्यक्ष अनिल मधुकर कदम यांनी दिनांक ०६ एप्रिल २०२२ च्या विशेष सर्व साधारण सभेत निकाल जाहीर केला होता. त्याप्रमाणे गेल्या निवडणुकीला ३ वर्ष पूर्ण झाले असुन आपण ६० दिवसाचा निवडणूक कार्यक्रम लावावयास हवा होता. पण आपण हेतुपुरस्कर लावलेला नाही.तरी आज दिनांक ०६ मार्च २०२५ वार गुरुवार रोजी त्रेवार्षिक निवडणूक घोषित करावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच F-22 च्या चेंज रिपोर्ट प्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्यकारी सदस्य. हे मंडळ बेकायदेशीर असल्याने सर्व जन करीत असलेला खर्च बेकायदेशीर आहे त्याला कुठल्याही नियमाने तो मंजूर नाही. तरी तो भविष्यात आपणा सर्वा कडून वसूल होण्याची शक्यता आहे असेही शर्मा यांनी यात नमूद केले आहे. निवेदनासोबत विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त ,खानदेश शिक्षण मंडळ, इलेक्शन ( निवडणूक) नियम ६० दिवसाचे अगोदर घोषित करावयाची प्रत सोबत जोडली असून निवेदनाचो प्रत सहा धर्मदाय आयुक्त जळगाव याना देण्यात आली आहे.




