
अमळनेर -येथील वकील संघाचे सभासद अॅड . प्रशांत आर. बडगुजर यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध अमळनेर वकील संघाने करून भारतीय वकील संरक्षण अधिनियम लागु करणेची मागणी करण्यात आली.
याबाबत प्रांताधिकारीना निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की अमळनेर वकील संघाचे सदस्य अॅड.प्रशांत आर. बडगुजर यांचेवर दिनांक ०४ रोजी न्यायदंडाधिकारी साो. वर्ग-१ यांचे कोर्ट हॉलबाहेर विरूध्द पक्षकार राजेंद्र पवार व त्यांची बहिण मिनाक्षी भामरे यांनी भ्याड हल्ला केला ह्याबाबतची सविस्तर गुन्ह्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला झालेली असुन सदर भ्याड हल्ल्याचा अमळनेर वकील संघाने तीव्र शब्दात निषेध ठराव पारीत केला असुन सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची व निंदनीय आहे. संबब सदर घटनेतील आरोपी यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश अमळनेर पोलीस स्टेशनला देण्यात यावे. भविष्यात अशा घटना होवू नये म्हणुन शासनाकडे प्रलंबीत असलेला भारतीय वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा या बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण अजबराव पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.




