
अमळनेर तालुक्यातील जाणून घ्या आपल्याकडील तपासणी तारीख
अमळनेर – महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कडील प्राप्त मार्गदर्शक सूचना नुसार दिनांक 1 मार्च रोजी जि. प. शाळा जवखेडा येथे आर. बी. एस. के. अंतर्गत विशेष तपासणी मोहीम चे उद्घाटन पार पडले.
या मोहिमे अंतर्गत सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजाराच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. यात जन्मजात व्यंग, कमतरता, आजार, व विकासात्मक विलंब शोधून त्यांना मोफत उपचार ,शस्त्रक्रिया करण्यात येतील. अमळनेर तालुक्यातील माहे मार्च महिन्यात 1 मार्च 25 ते 31 मार्च 25 पर्यंत शाळा व अंगणवाडी तपासणी वेळापत्रक करण्यात आले आहे.
त्यानुसार 3 मार्च रोजी अंगणवाडी आरडी, अनोरे, अटाळे, हेडावे,4 मार्च रोजी अंगणवाडी लोनपंचम, सुंदरपट्टी ,5 मार्च अंगणवाडी लोन बुद्रुक ,बोहरा,6 मार्च आश्रम शाळा पिंगळवाडे अंगणवाडी आंचलवाडी 7 मार्च अंगणवाडी, एक तास व आंबेडकर बॉईज हॉस्टेल,8 मार्च अंगणवाडी एकलहरे व धुपी,10 मार्च अंगणवाडी पाडळसरे ,दापोरी,11 मार्च आश्रम शाळा अंतुर्ली रंजाने व आश्रम शाळा ताडेपुरा, 12 मार्च अंगणवाडी भोरटेक व रुंदाटी,13 मार्च अंगणवाडी सबगव्हाण व कुर्हे ,15 मार्च अंगणवाडी कन्हेरे हिंगोणे मेहरगाव,17 मार्च अंगणवाडी बिलखेडा ,सोनखेडी, फापोरे,18 मार्च केंद्र शाळा मारवळ पुनर् तपासणी व अंगणवाडी पिंगळवाडे, 19 मार्च अंगणवाडी निमझरी केंद्रशाळा फापोरे,20 मार्च अंगणवाडी कळंबे बामणे व केंद्र शाळा फापोरे,21 मार्च आश्रम शाळा दहिवद व केंद्र शाळा शहापूर,22 मार्च केंद्रशाळा अंतुर्ली व न.पा.शाळा पुनर तपासणी 24 मार्च केंद्र शाळा मारवड व आश्रम शाळा चिमणपुरी झ25 मार्च केंद्र शाळा गडखांब व केंद्र शाळा वावडे,26 मार्च केंद्र शाळा सावखेडा व केंद्र शाळा शहापूर पुनर् तपासणी,27 मार्च केंद्र शाळा जानवे व केंद्र शाळा ढेकू पुनर तपासणे 28 मार्च केंद्र शाळा जैतपीर व केंद्र शाळा अंमळगाव 29 मार्च केंद्र शाळा दहिवद व केंद्र शाळा चिमनपुरी पिंपळे पुनर् तपासणी 30 ते 31 मार्च2025 या कालावधीत संदर्भित लाभार्थी साठी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या तपासणी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमळनेर तालुक्यासाठी कार्यरत असणाऱ्या दोन तपासणी पथकांमधील वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता आरोग्य सेविका यांचे मार्फत शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच शासकीय वस्तीगृह या ठिकाणी आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी व ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एम. पाटील यांनी केले आहे.




