
महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा झाला सन्मान
अमळनेर -येथील सुखांजनी फाऊंडेशन व सुखांजनी हॉस्पिटल तर्फे जागतिक महिला दिना निमित्त उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अमळनेर तालुक्यातील महिलांची”तपासणी व मार्गदर्शन शिबिर” तसेच उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा महिला दिनी पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खा. स्मिता उदय वाघ, अॅड.ललिता श्याम पाटील, तिलोत्तमा पाटील (मा.सभापती, कृ.उ.बा.समिती, अमळनेर), सुलोचना वाघ(जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस,जळगाव ),सुषमा वासुदेव देसले (संचालिका-कृ उ बा समिती, अमळनेर) , कल्याणी प्रफुल पाटील (उपसरपंच, शिरुड), कविता प्रफुल पवार(मा सदस्य,प स अमळनेर),डॉ अपर्णा मुठे(अध्यक्ष-महिला मंच,अमळनेर) यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.सुरवातीला आयोजक डॉ जयेश शिंदे यांनी प्रास्तविक केले.अध्यक्षीय मनोगत खा स्मिता वाघ तर अँड तिलोत्तमा पाटील व ऍड ललिता पाटील यांनी मनोगत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ. चंद्रकला प्रकाश महाजन,सौ. रश्मी शामकांत बडगुजर,सौ. शितल कृष्णा सोनार,रबीया बी बी शे. रमजान,सौ. जयश्री साळुंखे-दाभाडे,सौ. स्वप्ना विक्रांत पाटील,पीएसआय श्रीमती मंगलाताई वेताळ पवार,श्रीमती भारती पाटील, श्रीमती दर्शना पवार, सौ. सोनाली किरण वंजारी,सौ. वैशाली शरद शेवाळे,सौ. देवयानी शामकांत भावसार, श्रीमती डॉ. सुनंदाबेन गुजराथी,सौ. रंजना देशमुख,श्रीमती सिमा भिमराव रगडे,सौ. ज्योती भावसार,सौ. ललीता पाटील,सौ. पुष्पाताई आसाराम पाटील,सौ. उज्वला श्रीधर पाटील, श्रीमती कल्पना रविंद्र भिल,सौ. बेबीबाई प्रकाश,सौ. नम्रता अजय हिंदुजा,सौ. सरला शाम संदानशिव आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर येथे पार पडला. शेवटी आभार डॉ. सौ. प्रतिज्ञा शिंदे यांनी मानले.




