
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे येथील पोलीस पाटील सौ.अश्विनी दिनेश पाटील यांनी महिला दिनाचे औचित्य साधीत स्व-खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

फापोरे बुद्रुक येथील पोलीस पाटील सौ.अश्विनी दिनेश पाटील यांनी महिला दिनाचे औचित्य साधत एक महिला पोलीस पाटील या नात्याने आपले गावासाठी काही देणे लागते या उदात्त भावनेने गावातील चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून आदर्श निर्माण केला आहे.
शहरासह ग्रामीण भागात देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आपल्या गावाच्या सुरेक्षेच्या दृष्टीने सी. सी.टी.व्ही कॅमेरा महत्वाचा असून याने गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसेल, कायदा व सु-व्यवस्था अबाधीत राहील. यासाठी गावाच्या बस स्टॉप चौकातील उमा महेश्वर मंदीर चौकात हे सी. सी. टी. व्ही बसविण्यात आले. आश्विनी पाटील ह्या येथील माजी उपसरपंच दिनेश वसंतराव पाटील यांच्या पत्नी असून त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.




