
पालिकेचा अजब प्रकार अधिकारी तक्रारी करून देखील दखल घेत नाही
अमळनेर– १५ दिवसांपासून दोन ठिकाणी शेकडो लिटर पाणी गळती होत आहे. एक तर भर रस्त्यावर ग.स. सोसायटीच्या जवळ तर दुसरा पाण्याचा टाकीजवळच व्हॉल्व लीक पण गळतीची दुरुस्ती होत नसून तक्रारी करून देखील अधिकारी दखल घेत नाही अशी अवस्था नागरिकांची आहे.
मार्च महिना सुरू झाला रणरणत्या उन्हाळ्यात आवर्तन घेण्याची पाळी येऊ नये यासाठी या गळती थांबवल्या पाहिजेत अशी मागणी नागरिक करत आहेत. वेळोवेळी पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य कर्मचारी विजय विसावे यांना सांगितले. मात्र त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. जणू काही २४ तास पाणीपुरवठा योजना आताच सुरू होणार की काय अशा भ्रमात पालिका कर्मचारी वागत आहेत.
यंदाही भीषण टंचाई जाणवू शकते या पार्श्वभूमीवर उपाययोजना करायला हव्यात मात्र पालिका अधिकारी आणि कर्मचारी सुस्तावले आहेत.
गेल्या वर्षी आवर्तन घेण्याची पाळी – गेल्या वर्षी २०२४ ला आवर्तन घ्यावे लागले होते. यंदा पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र ही भविष्यात उपयोजना करण्यात पालिका अधिकारी अकार्यक्षम ठरले आहे. अशीच गळतीची समस्या राहिली तर मात्र पालिकेला आवर्तन घ्यावे लागले होते.
ही अवस्था पाहता अजून एप्रिल मे जून महिना काढायचा आहे. याचे भान पालिका अधिकाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे.
यंदा आताच टंचाईच्या झळा सुरू झालेल्या आहेत. जळोद डोहाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आताच अवेळी पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा केव्हाही होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी लक्ष घातले पाहिजे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
प्रतिक्रिया – लक्ष्मीनगर भागात व्हॉल्व व ग. स. सोसायटी जवळ रस्त्यावर पाणी गळती होत आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे नागरिकांना अवेळी पाणी मिळत आहे. मात्र कर्मचारी लक्ष देत नाही ही बाब दुर्दैवी आहे. -गोकुळ पाटील, नागरिक लक्ष्मीनगर
प्रतिक्रिया – दोन्ही ठिकाणी दुरुस्ती तातडीने करा अशा सूचना पालिका पाणीपुरवठा अभियंता व कर्मचाऱ्यांना कडक सूचना देऊन तात्काळ करायला लावतो म्हणजे पाणी वाया जाणार नाही. – तुषार नेरकर, मुख्याधिकारी




