
अमळनेरची सर्वात मोठी होळी,यंदा बरेच काही नविन खास!
अमळनेर-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंदडा बिल्डर्सच्या वतीने धुलीवंदन निमित्ताने ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे जोरदार आयोजन करण्यात आले असून, अमळनेरची सर्वात मोठी होळी म्हणून हा उत्सव प्रचलित झाला आहे

मुंदडा बिल्डर्स ने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली असून गावात विविध मंडळ, महिला मंडळ,प्रतिष्ठित व्यक्ती, युवती व राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहे.या होळीचे वैशिट्य म्हणजे फक्त रंग उधळणे नव्हे तर धमाल मस्तीचा हा सोहळा असून तोच सोहळा आणखी खास करण्यासाठी ‘रंग बरसे’ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे!
दरवर्षी प्रमाणे मुंदडा इस्टेट, ३०० बंगलोज, गलवाडे रोड, अमळनेर येथे हा उत्सव १४ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे.
यंदाच्या ‘रंग बरसे’ मध्ये खास काय ???
यंदाच्या रंग बरसे उत्सवात बरेच काही नवीन असणार असून यात प्रामुख्याने DJ Evelyn & DJ Aries – धडधड वाढवणारे तुफान बीट्स!, रेन डान्स – पाण्यात भिजत, रंगात न्हात वेगळी मजा!,लाइव ढोल – पारंपरिक आणि मॉडर्न बीट्सचा धमाका!, सेल्फी पॉईंट – होळीची आठवण कायम ठेवण्यासाठी परफेक्ट स्पॉट!
तसेच फूड स्टॉल्स यात तिखट, गोड आणि झणझणीत पदार्थांची रेलचेल!,कलर शॉवर – जिकडे पाहाल तिकडे फक्त रंगच रंग!,सोबत लकी ड्रॉ मध्ये जबरदस्त बक्षिसांची भेट ही भाग्यवंतांना मिळणार आहे!
या उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने फक्त कुटुंब आणि जोडप्यांसाठी प्रवेश असणार असून पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. अधिक माहितीसाठी 8459714639, 9403833516, 8793959999 यावर संपर्क साधायचा असून“होळी धम्माल करायची तर ‘रंग बरसे’ ला यायलाच हवं असे आवाहन मुंदडा बिल्डर्स च्या वतीने करण्यात आले आहे!”




