
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथून अज्ञात चोरट्यानी खळ्यात बांधलेल्या दोन गायी चोरून नेल्याची घटना १८ रोजी रात्री घडली.

कल्पेश धनराज पाटील यांच्या जवखेडा येथील वावडे रस्त्यावरील खळ्यात बांधलेली १० हजार रुपयांची गाय अज्ञात चोरट्यानी चोरून नेली . त्याचप्रमाणे दादाभाऊ आत्माराम पाटील यांचीदेखील गाय चोरीस गेलेली आढळून आली. कल्पेश याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.




