
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ६१ फुट उंच ध्वज उभारण्याच्या कामाचे व चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मांडळ येथे आजाद चौकात असलेल्या सुशोभीकरण कामाचचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी याप्रसंगी बोलताना मांडळ गावच्या तरुणांनी संघटितपणे निर्माण केलेल्या या शिवकार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे असे सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक समाधान भाऊ धनगर, हिरालाल पाटील यांचे मांडळचे माजी सरपंच सौ रंजनाबाई जितेंद्र पाटील यांनी औक्षण करून सत्कार केला.
याप्रसंगी जितेंद्र पाटील, मनोहर पाटील, बाळासाहेब पवार, डॉ अशोक पाटील, डॉ सुनील चोरडिया, विनायक बडगुजर आदींसह मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंतदास भाऊ, संतोष आबा पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी रोडे, रामा जीवन कोडी, नाना धनगर, मा सरपंच समाधान पाटील, उत्तम सर, सुनील पाटील, रवींद्र ,पाटील, संजय पाटील मोहन भाऊसाहेब, डॉ दीपक पाटील, संजय धनगर, अण्णाजी टेलर , वसंत बापू, रमा पैलवान, पुंजू मास्तर,सुनील बच्छाव, सुनील जैन, अनिल जैन, भाऊराव आबा, पांडू भिल, हेमंत पाटील, महेश धनगर, राजेंद्र गुरुजी,दरबार मुसा, जितू कोळी, सुनील आप्पा बडगुजर, प्रकाश पाटील,योगेश कोडी, गोकुळ शिरसाट, सुरेश पाटील, भैया पाटील, शशिकांत बडगुजर, हिरामण नाना, वासू मामा, खेमचंद पाटील, सागर टेलर,नितीन पाटील, रवींद्र पाटील, शांताराम टेलर, श्याम लोहार, राहुल लोहार, गोरख कोळी, गोरख भोई, राजेंद्र मराठे, रोहिदास भोई, अरे मिस्तरी, विकास सोसायटीचे सर्व सदस्य,आझाद मित्र मंडळ व शिव साई समिती मित्र मंडळ मांडळ चे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मांडळ गावाचे ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




