
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील न्यू प्लॉट भागातून ४० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील न्यू प्लॉट भागातील रहिवाशी पीयूष जैन यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल घरासमोरील अंगणात २६ रोजी सकाळी ११ वाजेपासून लावलेली होती.२७ रोजी सकाळी १० वाजता मोटरसायल पहिली असता ती दिसून आली नाही.कुणीतरी अज्ञात चोरट्याने ४० हजार किमतीची ही मोटारसायकल चोरून नेली असून पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. संतोष पवार करत आहेत.




