
मुस्लिम तरुणांचा कृतीतून सामाजिक एकता व सेवेचा संदेश
अमळनेर : चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थमध्ये अमळनेर येथील मुस्लिम तरुण आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर अजहर शब्बीर पठाण यांनी १३८ वेगवेगळ्या जातीय व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या बेवारस आणि अनाथ लोकांसाठी एका वेळच्या जेवणाची व्यवस्था केली.
समाजात माणुसकी आणि जातीय समानतेचा संदेश पोहचविण्यासाठी हा सामाजिक सेवेचा उपक्रम हाती घेण्यात आला. अजहर शब्बीर पठाण यांच्या या उपक्रमामुळे माणुसकीपेक्षा कोणताही धर्म मोठा नसतो हे सिद्ध होते. कोणत्याही जात, धर्मापलीकडे जाऊन समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना देखील सन्मानाची वागणूक मिळायला हवी. कोणतीही अडचण असो, गरजूंना मदत करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे अजहर पठाण, इंजिनीयर इमरान शेख आणि जियाउल हक यांनी आपल्या उपक्रमातून दाखवून दिले.




