
बालवीर व्यायामशाळेने आयोजित केली कुस्त्यांची दंगल…
अमळनेर : येथील कुस्त्यांच्या महादंगलीत मुख्य कुस्तीत नेपाळच्या देवा थापा याने हरियाणाच्या शेरा पैलवानाला चारी मुंड्या चित करत गदा आणि दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
बंगाली फाईल येथील बालवीर व्यायामशाळे च्या वतीने २७ रोजी कुस्त्यांची महादंगल ग्रामीण रुग्णालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , माजी आमदार शिरीष चौधरी ,महेंद्र महाजन यांच्या हस्ते प्रमुख कुस्ती लावण्यात आली. नेपाळच्या प्रसिद्ध कुस्तीपटू देवा थापा याने शेरा पैलवानला सळो की पळो करून सोडले होते. आपल्यापेक्षा उंच आणि मजबूत शेरा पैलवानला त्याने चारी मुंड्या चित केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत धुळ्याच्या ऋतिक राजपूत ने दिल्लीच्या शमशाद पैलवानला चित केले. या कुस्तीसाठी एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. भरत पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण १०५ कुस्त्या खेळल्या गेल्या. त्यात १३ ठेक्याच्या कुस्त्या होत्या. पंच म्हणून आप्पा पैलवान , युनूस पैलवान , शकील पैलवान यांनी काम पाहिले. स्पर्धांसाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील , के डी पाटील , राजेंद्र यादव , शब्बीर पैलवान , ज्ञानेश्वर पाटील , सुनील मोरे , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत , संजय पाटील ,जितेंद्र ठाकूर ,महेंद्र रामोसे ,आर जे पाटील , नरेश वाडेकर ,मुन्ना शेख हजर होते. या स्पर्धेसाठी बालवीर व्यायामशाळा , छत्रपती शिवाजी व्यायामशाळा , दि प्रतापकुमार व्यायामशाळा यांच्यासह डॉ जयेश शिंदे , डॉ डिगंबर महाले , सरजू गोकलाणी ,डॉ प्रशांत शिंदे , डॉ अनिल शिंदे , सनी चव्हाण , योगेश कदम , आकाश महाले , मुकेश साळुंखे , किरण डायिंगगडे ,सोहेब शेख ,महेश चव्हाण,सलीम टोपी ,योगेंद्र बाविस्कर , राहुल कंजर यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मध्यप्रदेश ,हरियाणा , जळगाव ,धुळे , पाचोरा , चाळीसगाव ,दिल्ली आदी ठिकाणाहून पैलवान सहभागी झाले होते.