
अमळनेर : शहरातील शिरुडनाका शिवाजीनगर मधील अल्पवयीन युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना १२ रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली
शिवाजीनगर दत्त मंदिराजवळील एक महिला लग्नात स्वयंपाक करायला गेली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती घरी परत आली असता तिला घराला कुलूप लावलेले दिसले. रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही म्हणून अखेर अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.





