
अमळनेर : तालुक्यातील वावडे येथील मूळ रहिवाशी व दहिसर येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले शिक्षक पंकज पाटील यांची कन्या हर्षदा हीने सामान्यांची असामान्य शाळा असलेल्या दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या ‘विद्या मंदिर’ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तीने दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण प्राप्त करत मराठी माध्यमाच्या शाळेतून पहिला येण्याचा बहुमान मिळवला.

ती अमळनेर येथील माजी नगरसेवक दीपक मनिलाल पाटील आणि वावडे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक सकाळचे पत्रकार किशोर मनिलाल पाटील यांची पुतणी आहे. या यशाबद्दल हर्षदा आणि तिच्या पालकांवर समाजाच्या सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





