शिक्षकांसह माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी जुन्या आठवणींना दिला उजाळा…
अमळनेर : मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील सन २००५-६ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची १९ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली असून यावेळी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, शाळेच्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व फुलांचा बुके देवून गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात दि.२५ रविवार रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून संस्था चालक श्रीकांत अनिल पाटील तर, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते. यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल पाटील, सिमा मोरे, पी.आर.पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.

सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपआपला परिचय करून देतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या एकोणावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र- मैत्रिणींना भेटून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतांना दिसून येत होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जागृती पाटील यांनी आपल्या वैशिष्ट्यपुर्ण शैलीतून केले. तर शाळेची माजी विद्यार्थीनी कवयित्री कल्पना देवरे यांनी चारोळ्या व कवितांच्या माध्यमातून सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर भदाणे, रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, गुलाब भदाणे, कुंदन वाघ, शरद पाटील, नगराज पाटील, योगेश पाटील, सचिन भदाणे, नरेंद्र बागुल, बापू धनगर, गणेश पाटील, निंबा पाटील, जितेंद्र पाटील, सतीश बागुल, नारायण पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व मित्रांनी व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




