
अमळनेर : तालुक्यातील धुपी शिवारात १५ वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

नगाव शिवारातील धुपी गडखांब रस्त्यावरील गट नम्बर ७/१ मधील भाग्यश्री पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत देवयानी संदीप पाटील हीचा मृत्यू झाल्याची माहिती दुपारी अडीच वाजता मिळाली. मुलीचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.





