
बस चालक व वाहकाने दाखवले खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन…
अमळनेर : पावसाचे दिवस होते एका मोटरसायकलवरून महिला खाली पडली उचलायला कोणी तयार नाही अशा परिस्थितीत बस चालक व वाहकाने एस टी थांबवून महिलेला दवाखान्यात पोहचवून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

झाडी गावाजवळ खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलस्वार यांची मोटरसायकल क्रमांक जी जे १८, एफ ई ६२१४ खड्ड्यात गेल्याने वृद्ध महिला रस्त्यावर पडून जखमी झाली. वृद्ध महिलेला दवाखान्यात नेणे गरजेचे असताना तिकडून शिंदखेडा अमळनेर बस क्रमांक एम एच १४ बी टी १३५२ बस आली. त्यावेळी ज्ञानेश्वर बोरसे , मयूर पाटील यांनी बस थांबवली आणि चालक अधिकार जयराम पाटील व वाहक वैशाली अर्जुन बोरसे यांना विनवणी करत जखमी वृद्धेला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता चालकाने एस टी सरळ डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखाण्यात आणली. दुर्दैवाने वृद्धेचा मृत्यू झाला असला तरी बस चालक आणि वाहकाच्या माणुसकीचे कौतुक होत आहे.





