
अमळनेर आगारास मिळालेल्या पाच नवीन बसेसचे थाटात लोकार्पण
अमळनेर :-येथील रा.प.म.एस टी आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने काल ७ रोजी सकाळी १० वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व मान्यवर आणि प्रवाश्यांच्या उपस्थितीत थाटात व वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील,विनोदभैय्या पाटील, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी,आगार प्रमुख अनिकेत न्हायदे उपस्थित होते.यावेळी सजविण्यात आलेल्या पाचही नवीन बसेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले की विद्यार्थी आणि प्रवाश्यांच्या सोईसाठी अमळनेर रा. प.आगाराला एकूण 25 नवीन बसेसची मागणी आपण केली असून त्यापैकी दहा मंजूर झाल्या आहेत,आज प्रत्यक्ष 5 प्राप्तही झाल्या असुन 5 लवकरच उपलब्ध होतील.याशिवाय अमळनेर आगारासाठी मंजूर झालेल्या 9 कोटी निधीतुन अर्ध्या स्थानकाचे नूतनीकरण काम जोमाने सुरू झाले आहे,लवकरच उर्वरित स्थानकाच्या कामासाठी देखील निधी मिळवून अमळनेर बस स्थानक मॉडेल स्थानक बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री अनमोल सहकार्य करीत असल्याने जनतेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो असे आमदारांनी सांगितले.

आमदारांनी स्वतः प्रवास करून आणल्या बसेस
आमदार अनिल पाटील यांनी स्वतःबसमध्ये विराजमान होत डीजे च्या तालावर या पाचही बस वाजतगाजत धुळे रस्त्यावरून वाजतगाजत बस स्थानकात आणण्यात आल्या.आमदारांसोबत एस टी चे अधिकारी, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेही विराजमान झाले होते.या बस रॅली कडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते.आपल्या हक्काची लालपरी आता नव्या रुपात येत असून सुरक्षित प्रवास म्हणून जास्तीतजास्त नागरिकांनी बस ने प्रवास करावा असाच संदेश आमदारांनी यानिमित्ताने दिला.
या नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. त्याचप्रमाणे बसेस अभावी काही फेऱ्या बंद झाल्या होत्या. त्या फेऱ्या पुन्हा सुरू होऊन विद्यार्थी , नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.यासाठी आमदार अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याने प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले
यावेळी एस टी कामगार संघटनेचे पदाधिकारी एल टी पाटील,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे ,अर्बन बँक संचालक प्रविण जैन,भास्कर बोरसे,महेंद्र पाटील,प्रा सुनिल पाटील यासह एस टी महामंडळचे प्रमोद बाविस्कर, विजय वाडेकर,पूनम जाधव,तुषार साळुंखे,मुकेश सैदाने, सतीश सातपुते,संदीप साळी,मनोज पाटील,दर्शन सोमवंशी,निलेश कंखरे,सौ धनगर,सौ अहिरे,नितीन पाटील,चंदू बोरसे,संजय मोरे, गजानन सूर्यवंशी, नरहरी पाटील,युनियनचे सर्व पदाधिकारी यासह वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




