
अमळनेर: येथील पोलीस ठाण्याचा लँडलाइन क्रमांक बंद आहे. बीएसएनएल कर्मचारी आणि अधिकारी यांना काम करून देण्यात वेळ नाही, अशी उत्तरे पोलिसांना दिली जात आहेत.

वास्तविक पाहता पोलिस ठाण्याचा दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा असूनही या महत्त्वाच्या कार्यालयात फोन बंद असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीला रिंग वाजते पण फोन ची रिंग पोलिसांना येत नाही अशी गत आहे. वारंवार काहीही तातडीची घटना घडल्यास मात्र घडून जाईल तरी माहिती मिळणार नाही अशी अवस्था पोलिसांची आहे. मात्र तोच बंद असून दुरुस्तीसाठी कर्मचारी येत नसल्याने पोलिसांनी डोक्याला हात मारून घेतला आहे.




