
अमळनेर :- येथिल खानदेश शिक्षण मंडळाच्या इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेला AICTE, न्यु दिल्ली यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून M.C.A. (Master of Computer Application) अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे. प्रताप महाविद्यालयात B.B.A./B.C.A. चा अभ्यासक्रम २००९- १० या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे.

M.C.A. चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश बिपीन गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज दिपचंद अग्रवाल,संचालक प्रदिप कुंनदलाल अग्रवाल,हरी भिका वाणी, कल्याण साहेबराव पाटील,विनोद राजधर पाटील,अनिल नथ्थु शिंदे,योगेश मधुसूदन मुंदडे,चिटणीस प्रा.पराग पी.पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण बी. जैन यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ.किरण सुर्यवंशी,प्रा.रोहन गायकवाड,कुलसचिव राकेश निळे, मुख्य लिपीक भटू चौधरी यांनी पाठपुरावा केला.
M.C.A. चा अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष माधुरी पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी अभिनंदन केले.




